आजच्या युगात अर्थकारण करायचे असेलतर ती व्यक्ती किंवा संस्था यांची विश्वासर्हता तपासली जाते. अर्थपुर्ण व्यवहारात आपला वेगळा ठसा निर्माण करत अर्थकारणाबरोबरच समाजहित ही जोपासण्याचे काम ज्या संस्था करतात त्या समाजावर अधिराज्य गाजवत विश्वासास पात्र राहून अगदी थोडया कालावधीत यशाचे "उत्तुंग शिखर गाठतात. आमच्या साई आदर्श मल्टीस्टेटने आपल्या नावातील आदर्शाप्रमाणे काम करताना आर्थिक क्षेत्रात आपला नावलौकिक "उंचावला आहे. सभासद व ठेवीदारांनी संस्थेच्या अर्थपुर्ण व्यवहारावर विश्वास ठेवुन ५१ कोटीं ठेवींचा पल्ला पार केला. ही किमया केवळ ५ वर्षात साधली यातच संस्थेचा वाढता आलेख लक्षात येण्यासारखा आहे.
अवघ्या एकशे पंचवीस सभासद व सव्वालाख रुपये भागभांडवलावर संस्था सुरु करून पाच वर्षात ३००००/- हुन अधिक सदस्यांना सेवा देऊन ५० कोटीपेक्षा अधिक ठेवींचा टप्पा पार करून लावलेले रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले हे सर्व ठेवीदारांनी आमच्यावर टाकलेल्या विश्वासामुळेच शक्य झाले.
आम्हाला आभिमान आहे साई आदर्श परिवारातील प्रत्येक सदस्याचा आणि प्रत्येक सदस्याला जिव्हाळ्याने व उत्तम सेवा देऊन जपणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांचा संस्थेच्या स्थापने पासूनचा प्रवास आम्हा सर्वांकरिता संघर्षाचा आहे. दरवेळी सकारात्मक मार्ग काढत आमची वाटचाल सुरु आहे. पाठीशी असलेल्या परिवारातील ३००००/- हुन अधिक सदस्य बँकिंग क्षेत्रातील अत्याधुनिक सेवा सुविधा देण्याची प्रेरणा देतात. आम्ही नेहमी ग्राहकसेवेचे व ग्राहकांसाठी मोठी मोठी स्वप्ने बघितली व ती पूर्ण करण्यासाठी सर्वानी आम्हाला साथही दिली. येणाऱ्या डिजिटल भारतासाठी आमचा प्रत्येक सदस्य तयार असावा या उदात्त हेतूने आम्ही पूर्वीच मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, फोन बँकिंग, आधार बँकिंग, SMS बँकिंग व इ. सेवा ग्राहकांसाठी सुरु केल्या व सर्वानी त्याचे स्वागत करत या सुविधा वापरायला आनंददायक सुरुवात केली. संस्थेच्या प्रवासाबद्दल सांगायचे झाले तर हा प्रवास आमच्यासाठी कसोटीचा होता व नेहमी राहणार साई आदर्श परिवारातील हजारो सदस्यांचा विश्वास, त्यांच्या ठेवींची जवाबदारी, ठेवीवर चांगला परतावा व सुरक्षितता, उत्तम सेवा इ. मध्ये आम्ही व आमचे कर्मचारी कुठेही कमी पडू नयेत याची काळजी घेत प्रगतीच्या वाटेवर प्रवास सुरु आहे. आम्ही मानतो कि आपल्याकडे पैशापेक्षा विश्वास मोठा आणि विश्वासापेक्षा श्रद्धा मोठी, श्रद्धापूर्वक अर्थसेवा करणारी मानस. हे महत्वाचे आहे.
व्यसायापलीकडेही आपण समाजाचे देणे लागतो, ज्या समाजाने आपल्याला उभे केले, प्रेम दिले त्यांच्याप्रति आपले काही कर्तव्य आहे. या भावनेतून आम्ही निस्वार्थीपणे सामाजिक कार्य करत आहोत या कार्याला आमच्या विचारांपेक्षा अधिक प्रोत्साहान मिळाले.
अनेकांनी विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आमचे मनोबल वाढवले. अनेक गरजूंच्या चेहऱ्यावरचे आनंदरूपी प्रेम आम्हाला पुढील कार्यासाठी प्रेरणा देत असते, अर्थातच तुम्हा सर्वांची साथ महत्त्वाचीच. येणाऱ्या वर्षात आम्ही ग्राहक सेवेस अनेक आधुनिक सेवा सुविधा घेऊन येतोय, तुमची साथ असेलच अशी अपेक्षा आहे. आपल्या ऋणातून मुक्त होऊच शकत नाही पण उतराई होण्याचा निश्चित प्रयत्न करू या वाटचालीत संचालक मंडळ, सभासद, कर्मचारी, कलेक्शन एजंट, मित्र परिवार, खातेदार यांचा सिहाचा वाट आहे. तुम्ही देत असलेल्या सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो.