ह्या खात्याचा उपयोग सर्वच करू शकतात, आपल्या वैयक्तिक देवाण घेवाणी साठी, वेळप्रसंगी लागणाऱ्या बचतीसाठी, दैनंदिन वैयक्तिक व्यवहारांसाठी ह्या खात्याचा उपयोग होतो, हे खाते वापराच्या काही सीमा असतात, खातेधारक दिवसभरत ५ व्यवहार ह्या खात्यातून करू शकतो. पण संस्थेच्या आधुनिक सुविधांच्या जोडीने ह्या खात्याचा वापर हा खातेदारांसाठी सुलभ व सोईस्कर ठरतो, ह्या सुविधांमध्ये इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, NEFT सारख्या सुविधांचा समावेश आहे, बचत खात्यात जमा केलेल्या रकमेवर खाते धारकास परतावा (व्याज) हि मिळतो.